पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून ‘या’ भागात पाणी कपात होणार, कारण…

On: May 5, 2025 8:35 AM
Thane water cut
---Advertisement---

Pune News | गर्मीच्या तीव्रतेमुळे पुणे शहरात पाणीपुरवठ्यावर ताण येत असून ५ मेपासून (सोमवार) दक्षिण पुण्यातील अनेक भागांमध्ये रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा संतुलित वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Pune News)

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शहरातील पाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर प्रचंड ताण पडत असून सध्याची क्षमता अपुरी पडते आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सोमवारपासून दक्षिण पुण्यातील काही भागांमध्ये झोननिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीपुरवठा रोखण्यासाठी रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक झोनमध्ये एका दिवसासाठी पाणी कपात केली जाईल. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणी कपात होणारे प्रमुख भाग  

पाणी कपातचा फटका पुढील परिसरांना बसणार आहे – सिंहगड रस्ता, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक. तसेच धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे आणि आगम मंदिर परिसरालाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.

वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 250 एमएलडी असली तरी प्रत्यक्षात 243 एमएलडी पाणीपुरवठा होतो. याशिवाय, आंबेगाव बु. व खुर्द परिसर, टँकर सेवा आणि तळजाई वनक्षेत्रासाठी मिळून २५ एमएलडी अतिरिक्त मागणी आहे, जी पूर्ण होऊ शकत नाही.

नागरिकांना महत्वाचे आवाहन 

महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे की उन्हाळा असेपर्यंत ही पाणी कपात योजना सुरू राहू शकते. पाणीपुरवठ्याची असमतोल स्थिती हाताळण्यासाठी हा तातडीचा आणि अपरिहार्य निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व गैरवापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 Title : Pune News Water Cuts from May 5 on Rotation Basis

 

Join WhatsApp Group

Join Now