पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!

On: June 4, 2024 11:54 AM
EVM New Rules
---Advertisement---

Pune News | लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळपासून देशभरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 2024ला कोणतं सरकार स्थापन होणार याकडे जनतेचं लक्ष आहे.

पुण्यातून (Pune News) भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघााडीवर आहेत, तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि वंचित बहूजन आघाडीचे वसंत मोरे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं.

काय केला आरोप?

देशात मतमोजणीला सुरुवात झाली असून जनतेचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. दरम्यान, पुण्यात (Pune News) मतमोजणी सुरु असताना काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मतमोजणी सुरु असताना EVM मशीन बंद पडल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. त्यामुळे पुण्यातील मत मोजणी देखील काही वेळासाठी थांबवण्यात आली होती.

मोहोळ किती मतांनी पुढे?

पुणे लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान झालं होतं. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे 20 लाख 61 हजार 276 मतदार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात केवळ 51.25 टक्के मतदान झालं होतं. दरम्यान, धंगेकर आमदार असलेल्या कसब्यात मुरलीधर मोहोळ यांनी लीड घेतली आहे. मोहोळ 4 हजारांनी पुढे असल्याचं म्हटलं जात आहे.

News Title : Pune news vote count has been stopped

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर

साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं निकालाबाबत मोठं भाकीत!

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; ‘या’ जागांवर महाविकास आघाडी सुसाट

अहमदनगर लोकसभेची गणित फिरली; आकडेवारीत झाला मोठा फेरबदल

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now