Pune News | गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आणि शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज (शनिवारी) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. (Pune News)
सकाळी सातनंतर शिवाजी रस्त्यावर अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकादरम्यान (हुतात्मा चौक) कार आणि बस वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग
शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस आणि इतर वाहने स. गो. बर्वे चौक, झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता मार्गे स्वारगेटकडे जातील.
स. गो. बर्वे चौकातून जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे.
या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चौकामार्गे इच्छितस्थळी जावे.
गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Title : Pune News Traffic Diversions-on-Shivaji-Road-Pune-Today-Due-to-Ganesh-Jayanti






