मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ भागातील पाणीही दूषित, धक्कादायक माहिती समोर

On: February 12, 2025 10:57 AM
Pune News Sahakarnagar Wells, Borewells Water Also Contaminated
---Advertisement---

Pune News | पुण्यातील सहकारनगर (Sahakarnagar) परिसरातील विहिरी आणि सोसायट्यांमधील बोअरवेलमधील पाणी दूषित झाल्याचे समोर आले आहे. उपनगरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होत असतानाच, ‘सहकारनगर नागरिक मंचा’ने केलेल्या पाण्याच्या तपासणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दैनंदिन वापरासाठी हे पाणी असुरक्षित असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. (Pune News )

पाणी तपासणी उपक्रम

पुणे (Pune) जिल्ह्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (Guillain-Barre Syndrome) (जीबीएस) रुग्ण आढळल्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुढे आला. यानंतर, ‘सहकारनगर नागरिक मंचा’ने पुढाकार घेऊन पाणी सुरक्षित आहे का, हे तपासण्यासाठी एक उपक्रम राबवला. यासाठी लागणारा खर्च स्थानिकांनी एकत्र येत केला. सहकारनगर भाग दोन आणि परिसरातील विहिरी, बोअरवेल, टँकर भरण्याची ठिकाणे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यासाठी अभ्यासकांना बोलावून पाहणी करण्यात आली.

परिसरातील सतरा ठिकाणी, म्हणजेच महापालिकेकडून येणारे नळाचे पाणी, विहिरी, सोसायट्यांमधील बोअरवेल आणि टँकर भरण्याच्या जागा अशा एकूण ३४ ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी खासगी तसेच महापालिकेच्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली.

तपासणीतील निष्कर्ष

पर्यावरण संवर्धन अभ्यासक केतकी साठे-कुलकर्णी (Ketaki Sathe-Kulkarni) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विहिरींप्रमाणेच बोअरवेलचे पाणीदेखील अशुद्ध असल्याचे आढळून आले. १५० ते ३०० फूट खोल असलेल्या बोअरवेलच्या पाण्यात ‘कॉलिफॉर्म्स’ (Coliforms) (आरोग्यास घातक विषाणू) आढळले. हे पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३० ते ५० फूट खोल विहिरींच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ (E. coli) जिवाणू आढळून आले. (Pune News )

दशभुजा आणि सातारा रस्त्यावरील विहिरींचे पाणी पिण्यासाठी तसेच इतर कोणत्याही वापरासाठी योग्य नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी तपासणी केलेल्या एका सोसायटीतील बोअरवेलचे पाणी त्यावेळी शुद्ध होते, मात्र आता तेदेखील दूषित झाल्याचे आढळले आहे. महापालिकेकडून येणारे पाणी शुद्ध असले, तरी त्यात ‘क्लोरीन’चे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

Title : Pune News Sahakarnagar Wells, Borewells Water Also Contaminated

 

Join WhatsApp Group

Join Now