Pune News | पाण्याप्रमाणेच आता कोंबड्यांमध्ये ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ (Campylobacter jejuni) (जिवाणू) आणि नोरोव्हायरसचे (Norovirus) निदान झाले आहे. पाण्यामधून या कोंबड्यांना ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आणि नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासणी केलेल्या कोंबड्या पुणे (Pune) जिल्ह्यातील असल्याने याचा नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) किरकटवाडी येथील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (Guillain-Barré Syndrome – GBS) उद्रेकाशी संबंध जोडता येणार नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. (Pune News)
धोका ‘जीबीएस’चा (GBS)
पुणे (Pune) जिल्ह्यात महिन्याभरापासून ‘जीबीएस’चे (GBS) रुग्ण आढळत आहेत. दूषित पाणी आणि अन्नातून रुग्णांना पोटदुखी, जुलाब, डायरियाचा त्रास झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिका (Municipal Corporation) आरोग्य विभाग, राज्याच्या आरोग्य विभागकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
चिकन दुकानांना सूचना
चिकनची विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत महापालिका पशुवैद्यकीय विभागाने शहरातील चिकन विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. सिंहगड रस्ता आणि रुग्ण आढळणाऱ्या भागातील दुकानांची पाहणी करण्यात आली आहे. चिकन धुताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा, अशाही सूचना देण्यात आल्याचे पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.
फार्ममधील (Farm) कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) (National Institute of Virology – NIV) पाठवले.
‘एनआयव्ही’कडे (NIV) कोंबड्यांच्या विष्ठेचे 106 नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 66 नमुन्यांपैकी 23 नमुन्यांत ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू असल्याचे निदान झाले. 60 नमुन्यांच्या नोरोव्हायरसच्या तपासणीपैकी पाच नमुन्यांत नोरोव्हायरस आढळल्याचे ‘एनआयव्ही’ने (NIV) स्पष्ट केले आहे. (Pune News)
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील आहेत. शहरातील सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी, खडकवासला या ठराविक भागांत ‘जीबीएस’चे (GBS) रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे या कोंबड्यांमध्ये आढळलेल्या जीवाणू आणि विषाणूचा संबंध ‘जीबीएस’शी (GBS) जोडता येणार नाही, असे पालिका आरोग्य विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे (Dr. Neena Borade) यांनी सांगितले.
प्राण्यांना त्रास नाही
प्राण्यांमध्ये ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ (Campylobacter jejuni) हा जीवाणू आढळतो. मात्र, प्राण्यांना या जीवाणूमुळे त्रास होत नाही. माणसांना या जिवाणूचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. नोरोव्हायरस (Norovirus) आणि चिकनमधून ‘जीबीएस’ची (GBS) शक्यता कमी आहे. दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याची शक्यता अधिक असल्याचे संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड (Dr. Amit Dravid) यांनी सांगितले. (Pune News)
Title : Pune News Now Chickens also Diagnosed with Norovirus






