पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

On: February 4, 2025 10:11 AM
Pune News no water supply
---Advertisement---

Pune News | सहकारनगर परिसरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत काही कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे येत्या गुरुवारी (६ फेब्रुवारी) संपूर्ण सहकारनगर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (७ फेब्रुवारी) या परिसरात कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल. (Pune News )

पाणी बंद राहणारा भाग

सहकारनगरमधील मेघना सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर क्रमांक दोन कमानीच्या आतील भाग, गोविंद गौरव सोसायटी, स्वानंद सोसायटी, नामदेव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, लकाकि सोसायटी, अण्णा भाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत, लक्ष्मीनगर मनपा शाळा क्रमांक १११ जवळील भाग या सर्वांचा समावेश आहे.

पुण्यातल्या खडकवासला धरणसाखळीमध्ये सध्या 19.41 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 66.58 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाण्याचा जपून वापर करा-

गेल्या वर्षीपेक्षा साधारणपणे दीड टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. शेतीचं आवर्तन बंद आहे. त्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Title : Pune News no water supply in sahakar nagar on thursday

 

Join WhatsApp Group

Join Now