Pune News | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) शहरातील नाट्यगृहांमध्ये (theaters) चित्रपट (movies) दाखवण्याची योजना आखत आहे. नाटकांचे प्रयोग आणि कार्यक्रमांची संख्या कमी असल्याने, तीन नाट्यगृहांमध्ये चित्रपटांसाठी पडदे बसवण्याचा विचार सुरू आहे. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये (budget) यासाठी तरतूद होण्याची शक्यता आहे. (Pune News)
तीन नाट्यगृहांमध्ये पडदे बसवण्याचा विचार
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग नसताना चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) सांस्कृतिक विभागानेही प्रायोगिक तत्त्वावर एक चित्रपट दाखवला होता. त्यानंतर एका चित्रपट महोत्सवाचे आयोजनही बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharv Rangmandir) येथे करण्यात आले होते.
तांत्रिक उणिवा दूर करण्याची गरज
नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे, तर समारोपाचा चित्रपट बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदर्शित झाला. बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये (Yashwantrao Chavan Natyagriha) आयोजकांनी यंत्रणा उभी केली होती. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नाट्यगृहामध्येच चित्रपटासाठी पडदा अंतर्भूत केला आहे, याच धर्तीवर तीन नाट्यगृहांमध्ये पडदा समाविष्ट केला जाणार असल्याची शक्यता आहे.
‘या’ नाट्यगृहांमध्ये बसणार पडदे
कमी आसन क्षमता असलेल्या नाट्यगृहांमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. औंध (Aundh) येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर (Pt. Bhimsen Joshi Kalamandir), घोले रस्ता (Ghole Road) येथील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (Pt. Jawaharlal Nehru Sanskrutik Bhavan) आणि येरवडा (Yerwada) येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Sanskrutik Kalamandir) या नाट्यगृहांमध्ये पडदा बसवण्यात येणार आहे. नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करताना सध्या काही तांत्रिक उणिवा आहेत. नव्याने पडदा बसविताना तांत्रिक अडचणी दूर झाल्यास प्रेक्षकांना चित्रपटगृहाची झलक अनुभवता येणार आहे. तसेच, चित्रपटांचे दर कमी असल्यास प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद घेणे शक्य होणार आहे. (Pune News)
Title : Pune News Movies in Pune Theaters Soon






