मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, भाच्याने केलं हादरवणारं कृत्य

On: February 10, 2025 5:58 PM
Pune News Man Sentenced to Life Imprisonment for Killing Nephew in Moving Bus
---Advertisement---

Pune News | पुण्याच्या (Pune News) खेड (Khed) तालुक्यात एकतर्फी प्रेमातून (One-Sided Love) एका 18 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Additional Sessions Court) आरोपीला जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. 12 जून 2018 रोजी घडलेल्या या हत्येचा निकाल तब्बल साडेसहा वर्षांनंतर लागला आहे.

नेमकं काय घडलं?

अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, मात्र मामा आणि मुलगी दोघांचाही लग्नाला नकार होता. या रागातून अजितने मामाचे कुटुंब संपवण्याचा कट रचला आणि मामाचा मुलगा श्रीनाथ खेसे याची हत्या केली. श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून (ST Bus) खेडच्या दिशेने निघाले असताना, मागच्या सीटवर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने (Sharp Weapon) श्रीनाथवर सपासप वार केले. त्याने कोयत्याने (Koyta) श्रीनाथचे डोके, मान आणि डोळ्यांवर हल्ला केला.

आरोपीची तुरुंगातून धमकी

अटकेनंतरही अजित तुरुंगातून (Jail) पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता. इतकेच नव्हे, तर त्याने थेट न्यायाधीशांसमोरही तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. (Pune News)

न्यायालयाचा निर्णय

आरोपी तुरुंगाबाहेर आल्यास मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन न्यायालयाने अजितला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी काम पाहिले.

प्रेमप्रकरणातून गुन्हेगारी

मामाची मुलगी आणि अजित पुण्यात वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering Colleges) शिक्षण घेत होते. विवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने अजितने त्या मुलीचे अश्लील फोटो (Obscene Photos) आणि खाजगी संदेश (Private Messages) फेसबुकवर (Facebook) पोस्ट केले होते. या प्रकरणी 8 जून 2018 रोजी मुलीने खेड पोलीस स्टेशनमध्ये (Khed Police Station) गुन्हा दाखल केला होता.

तक्रार दाखल केल्यामुळे संतापलेल्या अजितने फेसबुकवर (Facebook), “माफ कर दो भाईलोग, बहुत तडपा हू. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपना चाहिये,” असा मजकूर टाकला होता. (Pune News)

Title : Pune News Man Sentenced to Life Imprisonment for Killing Nephew in Moving Bus

 

Join WhatsApp Group

Join Now