पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय!

On: February 6, 2025 10:06 AM
Pune News Heavy Vehicles Banned in Pune City 
---Advertisement---

Pune News | वाढती वाहतूक कोंडी आणि गंभीर अपघातांची संख्या लक्षात घेता, पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दहा किंवा त्यापेक्षा जास्त चाके असलेल्या मल्टी ॲक्सल वाहनांसह (Multi Axle Vehicles) कंटेनर (Container) आणि ट्रेलर (Trailer) यांसारख्या अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी (Entry Ban) करण्यात आली आहे. सहा ते दहा चाकी वाहनांना मात्र रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेतच वाहतुकीस परवानगी असेल. (Pune News)

डंपर आणि मिक्सरसाठी दोन टप्प्यात बंदी:

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर धावणाऱ्या डंपरसाठी (Dumper) सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत बंदी असेल. तर, मिक्सर वाहनांना (Mixer Vehicles) सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत बंदी असणार आहे. ही बंदी सोमवार ते शनिवार असेल, तर रविवारी केवळ सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत बंदी असेल.

शहरातील ’31 रेड झोन’ निश्चित:

वाहतूक पोलिसांनी कोंडीची आणि अपघातांचे हॉटस्पॉट (Hotspot) विचारात घेऊन 31 ‘रेड झोन’ (Red Zone) निश्चित केले आहेत. या भागांमध्ये डंपर, मिक्सर आणि या संवर्गातील वाहनांना पूर्णतः बंदी असणार आहे. यामध्ये नगर रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता, गणेश खिंड रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण-सूस रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता, डी. पी. रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता आणि कोंढवा या भागांचा समावेश आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग:

नगर रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी: चंद्रमा चौक-वाघोली-खराडी बायपास-शास्त्रीनगर चौक-गोल्फ क्लब चौक-आळंदी चौक-पोल्ट्री चौक-हॅरिस पूलमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
सोलापूर रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी: हडपसर-भैरोबानाला-लुल्लानगर चौक-गंगाधाम चौक-मार्केट यार्ड असे जावे लागेल. हडपसर येथून मगरपट्टा-भैरोबा नाला-लुल्लानगर चौक-गंगाधाम चौक येथून मार्केट यार्डला जाता येणार आहे. (Pune News)

आवश्यक सेवेतील वाहनांना सूट:

मल्टी ॲक्सल वाहनांना प्रवेशबंदी असली तरी, कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन येणाऱ्या वाहनांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांनाही शहरात येण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतच जायचे असेल, तरच अशा वाहनांना प्रवेश दिला जाईल. दुसऱ्या शहरात जाऊ इच्छिणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही पुण्यात प्रवेशबंदी असेल.

शहराबाहेरील वाहतुकीला प्रोत्साहन:

शहरातून सध्या ये-जा करणारी 80 टक्के अवजड वाहने अन्य शहरात जातात. ही वाहने शहराच्या बाहेरूनच गेल्यास शहरातील रस्त्यांवरील ताण कमी होईल, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Pune News)

Title : Pune News Heavy Vehicles Banned in Pune City 

 

Join WhatsApp Group

Join Now