Pune News | वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागाच्या पुणे शाखेने (Pune Branch) नुकताच एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. तब्बल 1,196 कोटी रुपयांच्या या फसवणुकीत अनेक खासगी कंपन्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरु आहे. या कारवाईमुळे बनावट कंपन्यांद्वारे केल्या जाणाऱ्या करचुकवेगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Pune News)
बनावट कंपन्यांद्वारे फसवणूक
डीजीजीआयच्या (DGGIA) पुणे विभागीय कार्यालयाने केलेल्या तपासात, आरोपींनी बनावट कंपन्या स्थापन करून, कोणत्याही प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले तयार केली. पुणे (Pune), दिल्ली, नोयडा आणि मुझफ्फरनगरमध्ये छापे टाकून हे रॅकेट उघडकीस आणले. या कंपन्यांनी 1,196 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input Tax Credit) मिळवले आणि इतरांनाही दिले.
तपासात असे दिसून आले की, या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची, मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांची, वैयक्तिक माहिती चोरून त्यांच्या नावे कंपन्या रजिस्टर (Register) केल्या. या बनावट कंपन्या एकमेकांमध्येच वस्तू खरेदी-विक्री करत असल्याचे दाखवत होत्या. त्यांनी तयार केलेल्या बिलांवर आरएफआयडीचा (RFID)उल्लेख नव्हता, ज्यामुळे प्रत्यक्ष मालाची वाहतूक झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य सूत्रधाराला अटक
या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मुझफ्फरनगरमधील एका खासगी कंपनीचा संचालक आहे. त्याच्याकडे लोकांचे पत्ते, ओळखपत्र, ई-मेल आयडी (E-mail ID) आणि मोबाईल नंबरचा (Mobile Number) मोठा साठा होता, ज्याचा वापर तो नवीन जीएसटी (GST) रजिस्ट्रेशन (Registration) मिळवण्यासाठी करत असे. तो नवीन कंपन्या स्थापन करून त्यावर आपल्याच माणसांना संचालक म्हणून नेमणूक करत असे. (Pune News)
अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अधिकाऱ्यांना बनावट पावत्या, कंपन्यांचे शिक्के आणि इतर कागदपत्रे मिळाली. यावरून या सर्व बनावट कंपन्या एकाच ठिकाणाहून चालवल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत 20 बनावट कंपन्या शोधून काढल्या असून, एका बँकेतील (Bank) खाते गोठवले आहे.
Title : Pune News GST Fraud Unveiled 1,196 Crore Scam






