नातवांसाठी आजोबांनी केला महाराष्ट्रातील सर्वात महागडा तमाशा बुक!

On: February 8, 2025 12:16 PM
Pune News Grandfather Books Maharashtras Most Expensive Tamasha for Grandsons Birthday
---Advertisement---

Pune News | पुणे (Pune) जिल्ह्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील एका आजोबांनी आपल्या नातवांच्या वाढदिवसानिमित्त चक्क महाराष्ट्रातील सर्वात महागडा तमाशा (Tamasha) बुक केल्याची माहिती समोर आली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. माऊली वाघोले पाटील (Mauli Waghole Patil) असे या आजोबांचे नाव असून, ते देलवडी (Delwadi) गावचे रहिवासी आहेत. (Pune News )

नातू तन्मय वाघोले (Tanmay Waghole) आणि चिन्मय वाघोले (Chinmay Waghole) यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माऊली वाघोले यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रघुवीर खेडेकर (Raghuveer Khedekar) लोकनाट्य तमाशा मंडळाला यासाठी निमंत्रित केले. या तमाशासाठी माऊली वाघोले यांनी तब्बल 1 लाख 40 हजार रुपये मोजले.

मान्यवरांची उपस्थिती

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. माजी आमदार थोरात यांनी तमाशाच्या व्यासपीठावर जाऊन चिमुकल्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याबाबत अधिक माहिती देताना आजोबा माऊली वाघोले यांनी सांगितले की, “चार वर्षांपूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त मी इंदुरीकर महाराजांचं (Indurikar Maharaj) कीर्तन ठेवलं होतं. तसेच, चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम देखील घेतले होते. यावेळी वेगळा प्रयत्न केला आहे. तमाशा लोककला (Folk Art) आहे. ती कला जोपासण्याचा प्रयत्न याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला.” (Pune News )

तमाशा कलावंतांकडून शुभेच्छा

लोकनाट्य तमाशातील तब्बल 100 कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून चिमुकल्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. लोकनाट्य तमाशा आतापर्यंत गावोगावच्या यात्रांच्या निमित्ताने होत असतो. परंतु, पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने हा तमाशा आयोजित करण्यात आल्याने अनेक तमाशा शौकिनांनी (Tamasha Lovers) गर्दी केली होती. (Pune News )

Title : Pune News Grandfather Books Maharashtras Most Expensive Tamasha for Grandsons Birthday

 

Join WhatsApp Group

Join Now