धायरी, सिंहगड भागातील रखडलेल्या डीपी रस्त्यांबाबत महत्त्वाची अपडेट!

On: February 8, 2025 9:32 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी धायरी (Dhayari) आणि सिंहगड भागातील (Sinhgad Road) रखडलेल्या चार डीपी (विकास योजना) रस्त्यांसाठी तातडीने भूसंपादन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे धायरी, सिंहगड रोड भागातील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उपोषणदेखील करण्यात आलं होतं. अखेर प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) झालेल्या सर्वपक्षीय उपोषणानंतर रखडलेल्या डीपी रस्त्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वपक्षीय उपोषणानंतर प्रशासनाला जाग :

आप पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका अधिकारी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त भोसले यांनी रखडलेल्या डीपी रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

28 वर्षांपासून रखडलेले रस्ते :

गेल्या 28 वर्षांपासून हे डीपी रस्ते पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे धायरी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही, सिंहगड रस्ता ते धायरी सावित्री गार्डन, काकासाहेब चव्हाण बंगला ते नऱ्हे, बेनकर वस्ती ते नऱ्हे आणि परी कंपनी ते लक्ष्मी लॉज यांसारखे महत्त्वाचे रस्ते केवळ कागदावरच आहेत.

अलिकडच्या निषेध सभेत रूपाली चाकणकर, राहुल पोकळे, सनी रायकर आणि इतरांसह स्थानिक नेते आणि रहिवासी उपस्थित होते.

News Title: Pune Municipal Commissioner Orders Immediate Action on Delayed DP Roads in Dhayari and Sinhagad Areas

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now