Pune Loksabha Election | पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीचे नेते हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. वसंत मोरे हे प्रचारासाठी कुठेतरी मागे पडले असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी वसंत मोरे हे मनसेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यावर मनसेचे नेते साईनाथ बाबर यांचं नाव चर्चेत आलं होतं. तेव्हा वसंत मोरे यांनी मनसेला बाय बाय करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र म्हणावी अशी पुणेकरांकडून वसंत मोरे यांना साथ मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Loksabha Election)
ना धंगेकर ना मोरे पुण्यात मुरलीधर मोहोळच
वसंत मोरे यांना पुणेकरांकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha Election) साथ मिळेल अशी चर्चा होती. मात्र आता आजची पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पाहिल्यानंतर समजतंय की पुणेकरांनी ना धंगेकर ना मोरेंना साथ दिली. तर पुणेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना साथ दिली असल्याचं मतमोजणीतून समोर येत आहे. पुणेकरांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाच साथ दिल्याचं सकाळी 11.30 वाजेपर्यंतच्या कलावरुन दिसून येत आहे. (Pune Loksabha Election)
सोशल मीडियावर वसंत मोरे चर्चेत…
वसंत मोरे हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. गोरगरिबांचे अनेक प्रश्न ते सोडवताना दिसतात. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधीही फोन करतात. मात्र पुणेकरांचं ते प्रेम मतांमध्ये दिसून आलं नाही. सकाळी 11.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान मुरलीधर मोहोळ यांना 86 हजार मते, वसंत मोरे यांना फक्त 9 हजार मते मिळाली आहेत. तर रवींद्र धंगेकर यांना 78 हजार मते मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जादू केली आहे. भाजपच्या या मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. लोकसभेत त्याची पुनरावृत्ती रवींद्र धंगेकर करताना दिसत नाही. यामुळे ना धंगेकर ना वसंत मोरे पुणेकरांची पसंती फक्त मुरलीधर मोहोळ यांना मिळाली आहे.
News Title – Pune Loksabha Election Pune Peoples Rejected Vasant More
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!
अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?
लोकसभा निकालाच्या भीतीने शेअर मार्केटमध्ये मोठे बदल; पुढे काय होणार?
महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर
साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट






