पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा उद्रेक, पालिकेकडून मोठी घोषणा!

On: January 29, 2025 12:32 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (Guillain-Barré Syndrome) उद्रेक झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा (Health System) सतर्क झाली असून, रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय बनली आहे. अशातच, मागील 24 तासांत 4 नवीन रुग्णांची भर पडली असून, कमला नेहरू रुग्णालयात (Kamala Nehru Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारावरील उपचाराचा खर्च (Treatment Cost) सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने अखेरीस महापालिकेने (Municipality) मोफत उपचार (Free Treatment) करण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्याभरातच पुण्यातील GBS रुग्णांची संख्या 100 च्या वर पोहोचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती गंभीर (Critical Condition) असून, त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ पाहता, कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 खाटांसह (Beds) 15 अतिदक्षता विभाग (ICU) आरक्षित (Reserved) करण्यात आले आहेत.

Pune News l सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था :

गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या (GBS) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये (Government Hospitals) विशेष व्यवस्था (Special Arrangements) निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत.

पुणे शहरातील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात (Yashwantrao Chavan Memorial Hospital) उपचार केले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांनी दिली आहे.

सध्या पुण्यात 111 रुग्ण असून, त्यातील 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील (Radius) आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 35,000 घरे आणि 94,000 नागरिकांच्या चाचण्या (Tests) घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची (National Institute of Virology) मदत घेतली जात आहे.

दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाला असला तरी, तो GBS मुळेच झाला असल्याची अद्याप पुष्टी (Confirmation) झालेली नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title: Pune-GBS-Outbreak-Free-Treatment-Announced-by-Municipality

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now