पुण्याला पुराचा धोका वाढला; मेरीच्या अहवालातून मोठी माहिती समोर

On: January 28, 2025 12:09 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुण्यात भविष्यात मोठ्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) दिला आहे. मेरीने जलसंपदा विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, आगामी काळात मुठा नदीची निळी आणि लाल पूररेषा ही सध्याच्या पूररेषेपेक्षा किमान दीडपटीने विस्तारणार आहे.

मेरीच्या अहवालानुसार, पुढील २५ वर्षांत मुठा नदीत पावसाच्या पाण्यात १.८ पटीने वाढ होणार आहे. १०० वर्षांत हे प्रमाण अडीच पट असेल. मुळा नदीमध्ये पुढील २५ वर्षांत १.८२ पट पावसाचे पाणी वाढेल, तर १०० वर्षांत २.७ पट पाणी वाढणार आहे.

मुठा नदीतील लाल पूररेषा ही दोन लाख ५४,७१९ क्युसेकच्या विसर्गापर्यंत विस्तारणार आहे. तर, निळी पूररेषा एक लाख ७,७२४ क्युसेकपर्यंत विस्तारणार आहे.

पूररेषा विस्तारल्याने काय होईल? :

पूररेषा विस्तारल्यास नदीकाठची अनेक घरे आणि इमारती धोक्याच्या क्षेत्रात येतील. पुण्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नदीकाठच्या विकासकामांवर देखील याचा परिणाम होईल.

Pune News l उपाययोजना काय? :

पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी पुणे शहराला आगामी पुराचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. नदीपात्रात सरकारी, बिगर सरकारी असलेली अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नदीपात्रात असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत :

 

-पुणे महापालिकेने २०१७ च्या विकास आराखड्यात निळ्या आणि लाल पूररेषेचा समावेश करताना केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात.
-जलसंपदा विभागाने पूररेषेची खात्री करून नवीन अहवाल कोर्टाला सादर करावा.
-नागरिकांमध्ये पूर संबंधी जागरूकता निर्माण करावी.

News Title : Pune Faces Increased Flood Risk as Blue and Red Flood Lines Set to Expand

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now