बुधवार पेठेत जाणाऱ्यांसोबत मोठा स्कॅम, पुण्यातील बातमीनं मोठी खळबळ

On: July 17, 2025 6:16 PM
Epstein Files America
---Advertisement---

Pune | पुण्यातील (Pune) बुधवार पेठेत (Budhwar Peth) जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून, त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळणारी एक नवी टोळी नांदेड सिटी पोलिसांनी (Nanded City Police) गजाआड केली आहे. ‘ऑनलाइन पैसे देतो, तुम्ही रोख द्या’ अशी बतावणी करून आणि बदनामीची धमकी देऊन ही टोळी लोकांना लुटत होती. या प्रकरणी आयुष राजू चौगुले (Ayush Raju Chougule) आणि सदफ पठाण (Sadaf Pathan) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण बुधवार पेठेत (Pune) गेला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याचे नांदेड सिटी येथील घर गाठले. तिथे त्यांनी ‘आम्ही तुम्हाला २० हजार रुपये ऑनलाइन पाठवतो, तुम्ही आम्हाला रोख रक्कम द्या’ अशी बतावणी केली. तरुणाने पैसे देताच, आरोपींनी ऑनलाइन पैसे पाठवण्यास नकार दिला आणि उलट त्यालाच धमकावण्यास सुरुवात केली.

“तुम्ही बुधवार पेठेत (Pune) गेला होता, हे आम्ही सगळ्यांना सांगू आणि तुमची बदनामी करू,” अशी धमकी देत आरोपींनी तरुणाकडे पैशांची मागणी केली. या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा आले, जेव्हा आरोपींनीच पोलिसांच्या हेल्पलाइनवर फोन करून, ‘या तरुणाने आमच्याकडून २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली’ अशी खोटी तक्रार केली.

दोघांना अटक-

पोलिस घटनास्थळी दाखल होताच, त्यांनी प्रकरणाची शहानिशा केली असता, आरोपीच फिर्यादीला ब्लॅकमेल करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.

News Title – Pune Duo Arrested for ‘Online Payment’ Blackmail

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now