Ravindra Dhangekar | पुणे महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन थांबलेला असतानाच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुण्यात भाजप आणि महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात समोर आलेल्या या प्रकरणामुळे भ्रष्टाचार, पैसा आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. (Pune municipal election controversy)
पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटून तो डान्सबारमध्ये उधळला जात असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. महायुतीतील काही नेते आणि उमेदवार पुणे महापालिकेच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत धंगेकर यांनी थेट भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) वर हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुणेकर नागरिक आता मतदानातून योग्य धडा शिकवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Ravindra Dhangekar video)
डान्सबारमधील महिलांना लखपती दीदी बनवताय का? धंगेकरांचा सवाल :
रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत लाडकी बहीण योजनेवरून सवाल उपस्थित केला आहे. महिलांचा सन्मान करण्याच्या गप्पा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचेच उमेदवार डान्सबारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत आहेत, असा आरोप त्यांनी केला. डान्सबारमध्ये पैसे उधळून तिथल्या महिलांना लखपती दीदी बनवत आहात का, असा खोचक सवाल करत त्यांनी सरकारच्या दाव्यांची खिल्ली उडवली आहे.
संस्कृतीचे दाखले देणारे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) यांच्यावरही धंगेकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या पक्षात अशी चारित्र्यहीन ‘पिलावळ’ कशी वाढते, याचे उत्तर त्यांनी पुणेकरांना द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. अशा लोकांमुळे संपूर्ण पक्ष बदनाम होत असून, नैतिकतेच्या गप्पा केवळ दिखावा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Ravindra Dhangekar | पालिकेची तिजोरी उकळणाऱ्यांचा पर्दाफाश होणार :
भाजपने उमेदवारी देताना चारित्र्यहीन लोकांसाठी जणू वेगळे आरक्षणच ठेवले असल्याचा आरोप करत धंगेकरांनी महापालिकेच्या टेंडरमधील पैशांवर बोट ठेवले आहे. प्रचार प्रमुखच जर महापालिकेचा पैसा डान्सबारमध्ये उधळत असेल, तर अशा उमेदवारांकडून शहराच्या विकासाची काय अपेक्षा ठेवायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे लोक बाहेरून गोड बोलतात, पण आतून पालिकेची तिजोरी उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Ravindra Dhangekar video)
पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी पुणेकरांनी जागरूक होण्याची वेळ आली असल्याचे धंगेकर म्हणाले. पुणेकर हे सर्व पाहत आहेत, पण आता मतदानाच्या माध्यमातून आपला तिसरा डोळा उघडण्याची गरज आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि स्वाभिमानी पुण्यासाठी मतदान करा, असे आवाहन करत त्यांनी या प्रकरणाचा अंतिम फैसला जनतेकडे सोपवला आहे.






