पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा! वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी

On: January 14, 2026 11:07 AM
Pune Traffic Change
---Advertisement---

Pune Traffic Update | पुणे महानगरपालिकेच्या रिक्त जागांसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिक मतदानासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदारांना सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने मतदान करता यावे यासाठी पोलीस यंत्रणेसह वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. (Pune Traffic Update)

मतदानाच्या दिवशी तसेच त्याआधी व नंतर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत. हे वाहतूक बदल १४ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत लागू राहणार असून सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक प्रमुख मार्गांवर निर्बंध असतील. या काळात काही ठिकाणी जड व खाजगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. (Pune road closures)

हडपसर व कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक बदल :

हडपसर (Hadapsar) परिसरात मतदानाची प्रमुख केंद्रे असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साने गुरुजी परिसराकडे जाणारा मुख्य मार्ग या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांनी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग, माळवाडी डी.पी. रोड तसेच हडपसर गाडीतळ ते संजीवनी हॉस्पिटल डी.पी. रोडमार्गे सिद्धेश्वर हॉटेलच्या दिशेने जाण्याचा पर्याय वापरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात व्हीआयपी हालचाली आणि संवेदनशील मतदान केंद्रे असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नॉर्थ मेन रोडवरील लेन क्रमांक ‘सी’ ते पाणीपुरवठा केंद्र, बंडगार्डन घाट तसेच महात्मा गांधी चौक ते मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक या मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मुख्य रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Traffic Update | मध्यवर्ती पेठा, विमानतळ व दत्तवाडी भागातील निर्बंध :

समर्थ वाहतूक विभागांतर्गत पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या अनेक मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट चौक तसेच रामोशी गेट ते जुना मोठा स्टँड हे मार्ग बंद राहणार आहेत. या भागातील वाहतूक शांताई हॉटेल, क्वार्टर गेट चौक, बाहुबली चौक आणि सेव्हन लव्हज चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. (Pune Traffic Update News)

विमानतळ परिसरात फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता, सॉलिटेअर इमारत आणि निको गार्डन परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. विमान नगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक आणि दत्त मंदिर चौक या पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली जाईल.

तसेच विश्रामबाग विभागात पुरम चौक ते टिळक चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार असून, दत्तवाडी भागात बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा ते ना. सी. फडके चौक आणि सारसबाग खाऊ गल्ली मार्गावर निर्बंध असतील. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune municipal election 2026)

News Title : Pune Municipal Election 2026: Major Traffic Changes from 14 to 16 January, Roads Closed and Alternate Routes Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now