फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ लाखाचं बक्षीस!

On: February 27, 2025 11:33 AM
Dattatray Gade
---Advertisement---

Dattatray Gade l पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर (Swargate Bus Stand) मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात, मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या सात तुकड्या तपास करत आहेत. पुणे (Pune) पोलिसांनी आरोपीला पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न :

पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील (Smarthana Patil) यांनी सांगितले की, “आरोपीला पकडून देणाऱ्यास १ लाख रुपये दिले जातील. पोलीस (Police) दिवसरात्र तपास करत आहेत. आरोपीने मास्क घातल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, परंतु पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटवली आहे. तो बस स्थानकांवर फिरणारा असल्याने लवकरच सापडेल.”

Dattatray Gade l दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार :

तपासादरम्यान, दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तो काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने यापूर्वीही बस स्थानकांवर मुली आणि तरुणींना पोलीस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

राजकीय संबंधांची चौकशी :

दत्तात्रय गाडे एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ‘कार्यकर्ता’ असल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कातील राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याने स्वारगेट व्यतिरिक्त इतरही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे.

भूतकाळातील गुन्हे :

दत्तात्रय गाडेवर शिरूर (Shirur), शिक्रापूर (Shikrapur), अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे गुन्हे दाखल आहेत. त्याने ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडल्याचे गुन्हे त्याच्यावर आहेत. २०११ मध्ये त्याने कर्ज काढून घेतलेल्या चारचाकी गाडीने पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करताना अनेक महिलांना लुबाडले आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.

News Title: Pune Assault Case: 1 Lakh Reward for Information on Accused

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now