गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर

On: June 9, 2024 5:49 PM
Pune News Hit And Run Sasoon Doctor Maruti Car Crushes Three Men
---Advertisement---

Pune Accident | पुण्यामध्ये कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताने अनेकांची झोप उडवली होती. यामध्ये अल्पवयीन आरोपीने कल्याणीनगर येथे एका युवक आणि युवतीला मध्यरात्री मद्यधुंद होत कारने धडक दिली होती. यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. (Pune Accident)

गर्भवती महिलेला चारचाकीने उडवलं

पुण्याच्या निघोजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी स्विफ्ट गाडीने गर्भवती महिलेला उडवलं असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आल्याचं समजतंय. यामध्ये गर्भवती महिला ही जखमी झाली आहे. श्रद्धा येळवंडे असं त्या महिलेचं नाव आहे. सीसीटीव्ही मधील व्हिडीओ पाहिल्यास अंगावर काटा येतोय.

अपघातात श्रद्धा येळवंडे या महिला जखमी झाल्या आहेत. मात्र महिलेच्या पोटातील बाळ हे सुखरूप असल्याची माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी आता पिंपरी-चिंचवडचे महाळुंगे पोलीस चौकशी करत आहेत. हा अपघात शनिवारी 8 जून रोजी सायंकाळी झाला. कारच्या धडकेनं महिला थोडक्यात बचावली गेली. (Pune Accident)

घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

श्रद्धा येळवंडे या सायंकाळी पाचच्या सुमारास देहू-निघोज रस्त्याच्या डावीकडील बाजूने चालत होत्या. एका भरधाव कारने त्यांना मागून जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये त्या तिथे उडून पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.

या अपघातात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, धडक दिल्याने कार चालक न थांबताच त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident)

वाहन चालकाचा म्हाळुंगे पोलीस शोध घेत आहेत. ही महिला दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली. सध्या पुणे शहरात अपघाताच्या प्रमाणात अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Pune Accident)

News Title – Pune Accident Pregnant Lady News Update

महत्त्वाच्या बातम्या

‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स

मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण

‘सगळ्याचं श्रेय पुणेकरांना…’, मंत्रीपदाबाबत बोलत असताना मोहोळ भावूक

मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये लागली मंत्रि‍पदाची लॉटरी!

मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना डच्चू, भागवत कराडांचाही पत्ता कट

Join WhatsApp Group

Join Now