Pune Accident | पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता गुन्हे शाखेने आणखी एका डॉक्टराला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाच्या वैद्यकीय अहवालात अनियमितता आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप डॉक्टरावर करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आरोपीच्या ब्लड टेस्ट मध्ये अदलाबदल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी याबाबत ससून येथील डॉक्टर अजय तावरे यांना अटक केली आहे. तसंच रुग्णालयाचे एचओडीसह दोन डॉक्टरांना अटक झालीये.
डॅाक्टरच्या प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव
आरोपी मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले. त्यामुळे डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हरलोर यांना अटक झालीये. तर विशाल अग्रवाल हे अजय तावरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होते, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीये.
त्यातच कॉँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हरलोर हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते, असा दावा केलाय. इतकंच नाही तर, तावरे यांनी (Pune Accident ) यापूर्वी देखील असे अनेक काम केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.
अशात अजित पवार गटाचे नेते आमदार सुनिल टिंगरे देखील चर्चेत आले आहेत. डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्ती साठी आमदार सुनिल टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर, हसन मुश्रीफांनी नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यामुळे या प्रकरणात आता आमदार टिंगरे देखील चर्चेत आहेत. 2023 मध्ये टिंगरे यांनी हे पत्र दिले असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय.
यापूर्वी पोर्श कार चालवणाऱ्या आरोपीच्या बचावासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात होता. पोर्श कार चालक आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर टिंगरे यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये पहाटे भेट दिली होती. आता त्यांचं नाव या डॉक्टर प्रकरणात देखील आलंय.
डॉ.अजय तावरे आणि सुनिल टिंगरे यांचा संबंध काय?
2022 मध्ये झालेल्या किडनी तस्करी प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात तेव्हा ससूनचे अधिक्षक डॉ.अजय तावरे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तावरे हे जवळपास 10 वर्षे ससूनचे अधिक्षक राहिले आहेत. मात्र, नंतर डॉ. यल्लापा जाधव यांनी या पदावर दावा सांगितला. पुढे तावरे यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. नंतर तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. आता तावरे यांचं (Pune Accident) नाव पुणे अपघात प्रकरणात आल्यामुळे आमदार टिंगरे देखील अडचणीत आले आहेत.
News Title – Pune Accident doctor Ajay Taware and Sunil Tingre connection
महत्त्वाच्या बातम्या-
उन्हाळ्यात चमचमीत खाण्यापेक्षा ‘हे’ पदार्थ खा; मिळतील आश्चर्यकारक फायदे
“माझी 50 टक्के मालमत्ता…”, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य
लोकसभेच्या निकालानंतर गॅस सिलिंडर महाग होणार?; चर्चेला उधाण
मोबाईल वापरकर्त्यांना फटका! ‘या’ मोफत सेवा झाल्या बंद, मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बॉलीवुडचा ‘किंग खान’ दिवसाला किती कमावतो?; आकडा वाचून हैराण व्हाल






