अग्रवाल कुटुंबामुळे माझ्या मुलाने… तक्रारदार पित्याच्या आरोपांनी पुण्यात पुन्हा खळबळ

On: May 27, 2024 3:47 PM
Pune Accident case Serious allegations against Agarwal family
---Advertisement---

Pune Accident case | पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या अपघात प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल सह त्याचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंन्द्र अग्रवाल यांनाही अटकेत घेतलं आहे. अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या सध्या अडचणीत आहेत.

अशात एक धक्कादायक माहिती समोर आलीये. अग्रवाल कुटुंबाविरोधात अजून एकाने तक्रार केलीये. काही मीडिया रिपोर्टनुसार दत्तात्रेय कातोरे हे अग्रावाल कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करायला पुढे आले आहेत.

“पैसे मिळत नसल्याने मुलाने आत्महत्या..”

दत्तात्रेय कातोरे हे अग्रवाल कुटुंबाच्या कंपनीत काम करत होते. अग्रवाल कुटुंबाकडे 84 लाख 50 हजाराची थकबाकी असल्याचा आरोप दत्तात्रेय कातोरे यांनी केलाय. इतकंच नाही तर, पैसे मिळत नसल्याने आपल्या मुलाने गळफास घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.

यामुळे अग्रवाल कुटुंब पुन्हा अडचणीत सापडण्याची (Pune Accident case ) शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून अग्रवाल कुंटुंबाविरोधात कुणाची तक्रार असेल तर समोर यावं, असं आवाहन करण्यात आलंय. त्यात पहिली तक्रार शिंदे गटाचे अजय भोसले यांनी केली होती. 2009 मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता.

अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी वाढणार?

तर, आज (27 मे) दत्तात्रेय कातोरे यांनी तक्रार केलीये. मागील काही दिवसांपासून अग्रवाल कुटुंबाकडे बरेच पैसे जमा होते. 9 तारखेला माझा मुलगा त्यांच्या रेसेडेन्सी ऑफिसला गेला. तर त्याला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्याला हाकलून लावले. त्या टेन्शमध्ये येऊन माझ्या मुलाने घरी येऊन गळफास घेतला. असा आरोप दत्तात्रेय कातोरे यांनी केलं आहे.

या प्रकरणी दत्तात्रेय कातोरे एफआयआर देखील (Pune Accident case ) दाखल करणार होते. मात्र वकील चंदन पोलीस स्टेशनला आले. आम्ही तुमचे पैसे देतो म्हणून त्यांनी सांगितले. पण, अजूनही पैसे मिळाले नसल्याचे दत्तात्रेय कातोरे यांनी सांगितलं. यामुळे अग्रवाल कुटुंब पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

News Title –  Pune Accident case Serious allegations against Agarwal family

महत्त्वाच्या बातम्या-

मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या, डॅाक्टरच्या प्रकरणात पुन्हा आलं नाव

उन्हाळ्यात चमचमीत खाण्यापेक्षा ‘हे’ पदार्थ खा; मिळतील आश्चर्यकारक फायदे

“माझी 50 टक्के मालमत्ता…”, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य

लोकसभेच्या निकालानंतर गॅस सिलिंडर महाग होणार?; चर्चेला उधाण

Join WhatsApp Group

Join Now