थरारक… चार घटना अन् पुणेकरांना थेट 60 लाखांचा गंडा

On: February 13, 2025 11:11 AM
Cyber Fraud
---Advertisement---

Pune Fraud News l पुण्यात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आठवडाभरात तब्बल 60 लाख 27 हजार 156 रुपयांची फसवणूक केली आहे. विविध आमिषे दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे.

चार घटना नेमक्या कशा घडल्या? :

लोणीकंद, कोंढवा आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे.

Pune Fraud News l पहिली घटना :

लोणीकंद येथील 39 वर्षीय महिलेला विविध टास्क देऊन अधिक कमाईचे आमिष दाखवण्यात आले. या महिलेकडून 32 लाख 2 हजार रुपये उकळण्यात आले.

दुसरी घटना :

कोंढव्यातील 47 वर्षीय व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 12 लाख 34 हजार 456 रुपयांची फसवणूक केली.

तिसरी घटना :

हांडेवाडी येथील 36 वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 11 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केली.

चौथी घटना :

उंड्री येथील 38 वर्षीय महिलेला पार्ट टाइम जॉब करून जास्त नफा मिळवण्याचे आमिष दाखवून 4 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केली.

पुढील तपास सुरू :

पोलिस या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

News title : Pune 4 Cyber Fraud News

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now