पुणे जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

On: February 8, 2025 10:11 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) राखण्याच्या दृष्टीने 21 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory Orders) जारी करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम (Jyoti Kadam) यांनी हे आदेश काढले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशात ‘या’ गोष्टींवर बंदी:

– कोणताही दाहक पदार्थ (Combustible Material) अथवा स्फोटक पदार्थ (Explosive Material) सोबत बाळगणे.
– दगड, शस्त्रे (Weapons) किंवा अस्त्रे, तसेच ती सोडण्याची किंवा फेकावयाची हत्यारे (Tools) अगर साधने सोबत बाळगणे.
– शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा (Physical Injury) करण्यासाठी वापरात येणारी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे.
कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे (Symbolic Dead Body) किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे (Statue) प्रदर्शन व दहन करणे.
– मोठ्याने अर्वाच्च घोषणा (Loud abusive slogans) देणे, वाद्य वाजवणे.
– सभ्यता (Civility) अगर नीतिमत्ता (Morality) यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता (Security of the State) धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करणाऱ्या कृतीस बंदी आहे.
– आवेशपूर्ण भाषणे (Passionate Speeches) करणे, अविर्भाव करणे, कोणताही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.
– कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा वर्तनावर बंदी आहे.
– पाचपेक्षा जास्त लोक जमवणे, मिरवणुकी काढणे (Processions) यांवर पोलिस अधीक्षकांच्या (Superintendent of Police) परवानगीशिवाय बंदी घालण्यात आली आहे.

Pune News l प्रतिबंधात्मक आदेशाचा उद्देश :

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने (Police Administration) हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title : Prohibitory Orders Imposed in Pune District Till 21st February

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now