पूजेदरम्यान मिळणाऱ्या ‘या’ संकेतांवरून ओळखा, देव प्रसन्न आहे

On: February 24, 2025 2:02 PM
Premanand Maharaj
---Advertisement---

Premanand Maharaj | आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भगवंताची पूजा, भक्ती आणि श्रद्धा या गोष्टींना एक विशेष स्थान आहे. अध्यात्म प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाचे असते, तसेच पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण केलेली पूजा भगवंतापर्यंत पोहोचते का? किंवा पूजा करतेवेळी भगवंत आपल्याला काही संकेत देतात का? या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. पण हे घडत असेल, तरी ते आपल्या लक्षात कसे येणार? याबद्दल प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांनी सांगितले आहे.

प्रेमानंद महाराजांनी पूजेदरम्यान मिळणाऱ्या संकेतांबद्दल काय सांगितले?

प्रेमानंद महाराज यांनी पूजेदरम्यान मिळणाऱ्या काही खास संकेतांबद्दल सांगितले आहे. आपली पूजा यशस्वी झाली आहे आणि देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे, हे कसे ओळखायचे, याबद्दल प्रेमानंद महाराज यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर, पूजेवेळी घडणाऱ्या काही गोष्टी आणि त्यांचे संकेत काय असू शकतात, ते पाहुयात.

दिव्याची ज्योत उंच होणे: तुम्ही पूजा करत असताना किंवा प्रार्थना म्हणत असताना दिव्याची ज्योत अचानक उंच होताना दिसली, तर हा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो. याचा अर्थ देवापर्यंत तुमची प्रार्थना पोहोचली असून तो तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. हा संकेत म्हणजे देव तुमच्यासोबत आहे आणि तुमची पूजा त्याने स्वीकारली आहे.

डोळ्यांतून अश्रू येणे: प्रेमानंद महाराज सांगतात की, जेव्हा तुम्ही अगदी मनापासून देवाशी जोडलेले असता, तेव्हा पूजेदरम्यान डोळ्यात अश्रू येऊ शकतात. हे अश्रू केवळ दु:ख किंवा वेदनेचे नसतात, तर ते एक प्रकारच्या आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक असतात. अशा परिस्थितीत भक्ताची इच्छा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण देवाला पूर्णपणे आपला विश्वास आणि श्रद्धा समर्पित करतो, तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो.

देवाच्या फोटोवरील फुले खाली पडणे: तुम्ही पूजा करत असताना तुमच्या मनात एखादा प्रश्न किंवा इच्छा असेल, जी पूर्ण व्हावी, अशी तुम्ही प्रार्थना करत असाल आणि तेव्हा देवाला वाहिलेले फूल जर खाली पडले, तर ते शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुमच्या भक्तीवर आनंदी आहे. हे तुमच्या आयुष्यात यश आणि समृद्धी येणार असल्याचे किंवा काही चांगली बातमी मिळू शकते, हे देखील दर्शवते. (Premanand Maharaj)

पूजेदरम्यान अचानक घरी पाहुणे येणे: प्रेमानंद महाराज यांच्या मते, जेव्हा तुम्ही पूजा करत असता आणि त्याच वेळी अचानक कोणी पाहुणे तुमच्या घरी येतात, तेव्हा तो एक शुभ संकेत असतो. ‘अतिथी देवो भव:’ या ओळीचा अर्थ हाच होतो की घरी आलेला प्रत्येक पाहुणा हा देवासमान असतो. त्यामुळे घरी अचानक आलेले पाहुणे किंवा एखादी व्यक्ती ही देखील देवाच्या रूपातच आल्याचा संकेत असतो. ही घटना एक प्रतीक मानली जाते की, देव तुमच्या भक्तीवर आनंदी आहे आणि तुमच्या भावनांचा आदर करत आहे. पाहुण्यांचे आगमन हे एक शुभ चिन्ह आहे, जे दर्शवते की तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ लवकरच मिळेल.

Title : Premanand Maharaj says this Signs Indicate God is Pleased with Your Devotion

 

Join WhatsApp Group

Join Now