‘रोहित पवार पोरकट…’; प्रणिती शिंदेंनी उडवली खिल्ली

On: February 10, 2023 6:19 PM
---Advertisement---

सोलापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना रोहित पवारांनी प्रतिनिधी बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवारांच्या वक्तव्याबद्दल प्रणिती शिंदेंना (Praniti shinde) विचारलं असतं रोहित पवारांनी कोण रोहित पवार, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांची खिल्ली उडवली.

रोहित पवार अजून मॅच्यूअर नाहीत. त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे. त्यामुळे ते असा पोरकटपणा करतात, अशी खोचक टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे.

दरम्यान, आमच्या नेत्यांवर वारंवार शाब्दिक आणि आता फिजीकल हल्ले होत आहेत. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आज एका महिला आमदारांवर ज्याप्रकारे हल्ला झाला, त्याच्या मागचं कारण पुढे आलं पाहिजे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात.

दरम्यान, जर एका महिला आमदारावर असे हल्ले होत असतील, तर सामान्य महिलांचं काय होत असेल?, असा प्रश्नही प्रणिती शिंदेंनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now