“मी राज ठाकरेंना घाबरत नाही!”; ‘या’ बड्या नेत्याची बेधडक प्रतिक्रिया

On: December 11, 2025 12:38 PM
raj thackeray (1)
---Advertisement---

Raj Thackeray | माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडल्यानंतर प्रथमच बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते थेट राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेत आले असून, त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. हिंदुत्वापासून मनसे दूर जात असल्याचा आरोप करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, या मुलाखतीदरम्यान महाजन यांनी आपण राज ठाकरे यांना घाबरत नसल्याचे सूचक विधान केले आणि भाजप प्रवेशाचेही स्पष्ट संकेत दिले.

मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाजन यांनी प्रथमच आपल्या मनातील गोष्टी समोर मांडल्या. “मी संघ विचारांचा आहे, शाखेत जातो,” असे ठामपणे सांगत त्यांनी आपली विचारसरणी स्पष्ट केली. त्यांच्या या विधानानंतर मनसेशी असलेले मतभेद आणि पुढील राजकीय दिशेबाबतच्या चर्चा अधिकच गतीमान झाल्या आहेत.

मनसे सोडण्याचे कारण स्पष्ट :

प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांना मनसे सोडण्यामागे कोणते कारण होते, याबद्दल विचारणा होताच त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. “मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. मी संघ विचारांचा माणूस आहे. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “मी राज ठाकरेंना घाबरत नाही,” असेही म्हटले.

महाजन यांच्या या विधानामुळे मनसेच्या धोरणांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षे पक्षात कार्यरत असलेल्या महाजन यांनी पक्षाची दिशा बदलत असल्याचे आरोप केले आणि यामुळेच मोठा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.

दरम्यान त्यांनी आपल्या मुलगा वैभव महाजनच्या (Vaibhav Mahajan) राजकीय प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले. वैभव महाजन सध्या भाजपमध्ये सक्रिय असून, “माझा मुलगा भाजपमध्ये आनंदी आहे, त्यामुळे मलाही आनंद आहे,” असे महाजन यांनी सांगितले. या वक्तव्यावरून महाजन यांची पुढील दिशा अधिक स्पष्ट होताना दिसत आहे.

Raj Thackeray | मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली :

अलीकडेच प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीबद्दल बोलताना महाजन यांनी स्पष्टीकरण दिले की, “माझं वैयक्तिक काम होतं. शिवाय आमचे पारिवारिक संबंध आहेत, त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट होती.” मात्र या भेटीने भाजप प्रवेशाचे संकेत अधिक ठळक झाले.

त्यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले, “मी कधीच भाजपविरोधात काम केलेलं नाही. आता निर्णय भाजपने घ्यायचा आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, महाजन यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे.

News Title: Prakash Mahajan Says “I Am Not Afraid of Raj Thackeray”, Hints at Joining BJP After Leaving MNS

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now