Aurangzeb Tomb Controversy | छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला असून, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे. (Aurangzeb Tomb Controversy)
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर एक ट्वीट करत भाजपा (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे ट्वीट
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रमुख अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर पुढील अयोध्या होणार आहे. 2026 च्या निवडणुकीत भाजप आणि आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर प्रचार करणार आहेत.” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
They are making Aurangzeb the agenda for the next Lok Sabha elections.
Aurangzeb’s Tomb is the next Ayodhya!!!
BJP-RSS will contest the elections, going to happen in 2026, on Aurangzeb’s Tomb!
Yes, you read everything right! Aurangzeb’s Tomb going to be the next Ayodhya;… pic.twitter.com/GNCbVq4ls3
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 18, 2025
एकनाथ शिंदे यांचीही तीव्र भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, “शिवभक्तांची जी भूमिका आहे, तीच माझीही आहे. औरंगजेबाची कबर कशाला पाहिजे?” असा थेट सवाल केला आहे. त्यामुळे हा विषय आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. (Aurangzeb Tomb Controversy)
दरम्यान, औरंगजेबाची कबर प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियम 1951 अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे. यामुळे ती हटवणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. तसेच, ही जागा वक्फ बोर्डाच्या अखत्यारित असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या मागणीला कितपत यश मिळेल, हा मोठा प्रश्न आहे.
Title : Prakash Ambedkar Tweet on Aurangzeb Tomb Controversy






