“त्या गरजा माझ्या खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

On: November 24, 2024 1:17 PM
prajakta mali
---Advertisement---

Prajakta Mali | मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना कायम भूरळ घालत असते. तरुण आणि तरुणी तिच्या मादक अदांवर अक्षरशः फिदा आहेत. मराठी टेलेव्हिजनवर प्राजक्ताची एक मालिका प्रचंड गाजली होती. जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता कायम सक्रिय असते. चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

लग्नाबद्दल प्राजक्ताचा खुलासा-

प्राजक्ताच्या (Prajakta Mali) चाहत्यांना प्राजक्ताच्या (Prajakta Mali) लग्नाची घाई लागलेली असते. अनेक मुलाखतीमध्ये प्राजक्ताला तु लग्न कधी करणार आहेस? असे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, प्राजक्ताने अनेक वेळा या प्रश्नाचं उत्तर देण टाळलं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा प्राजक्ताने यावर मौन सोडलं आणि यावर ती म्हणली की, दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मानसिक शांतता-

बोलत असताना प्राजक्ता म्हणाली की, माझ्या आनंदात जर कुणी आणखी आनंद अॅड करणार असेल तर मी लग्न करेन. दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार. डोक्याचा भुगा नको. डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्न नाही करायचं. पुढे ती म्हणाली (Prajakta Mali) की, मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे, असं प्राजक्ता म्हणाली.

अनेकदा सामाजिक, शारिरिक, मानसिक आर्थिक गरजांसाठी मुली लग्न करतात. पण माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. अध्यात्मामुळे तर माझ्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. हे सगळं जिथं संपतं तिथं प्रेम आणि विश्वासाच्या जीवावर ते नातं टिकतं. त्यामुळेच तसाच जोडीदार हवा, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.

News Title : Prajakta Mali talks about her marriage

महत्त्वाच्या बातम्या-

बच्चू कडूंना पराभवाचा जोरदार धक्का, म्हणाले मी…

मोठी बातमी! औक्षण करताना उडाला भडका, नवनिर्वाचित आमदार जखमी

भाजपने विधानसभेला ‘ती’ चूक टाळली; भाजपच्या यशाचं गुपित समोर

निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कुठं घडली घटना?

निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now