Post Office ची कमाल योजना; ‘या’ योजनेतून महिन्याला मिळेल 20 हजार रूपये

On: May 5, 2024 1:03 PM
Post Office
---Advertisement---

Post Office | पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजनेच्या माध्यमातून आता सामान्य नागरिकांना चांगला परतावा मिळणार आहे. महिना 20 हजार रूपये परतावा मिळवता येणार आहे. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजनेचा विचार केल्यास आता कसलीही चिंता नाही. कारण या योजनेच्या माध्यमातून कोणतीही रिस्क नाही. सरकार गुंतवणूकदारांच्या पैशांची हमी घेतंय. खासकरून सिनीयर सिटिझन सेव्हिंग स्किम म्हणजेच 60 वयाच्या पुढील वयोवृद्धांसाठी ही योजना फार फायदेशीर आहे.

म्हातारपणात पोटची मुलं आपल्या आई-बाबांची देखभाल करत नाही. हा काळ वृद्धांसाठी तसा कसोटीचा असतो. उतरत्या वयानुसार त्यांच्यातील ऊर्जा कमी होऊ लागते. अशा स्थितीत त्यांना अर्थिक संघर्ष करावा लागतो. मग अशा स्थितीत वयोवृद्धांसाठी आर्थिक पाठबळ उभं राहण्यासाठी सरकारने सिनीयर सिटिझन सेव्हिंग ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून एफडीहून अधिक 8 टक्के व्याज दरानुसार परतावा मिळतो.

सिनीयर सिटिझन सेव्हिंग योजना

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजनेचा विचार केला तर महिना आर्थिक परतावा हा एखाद्या एफडीहून अधिक मिळतो. याचं मासिक अर्थिक व्याज हे 8.2 टक्के आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्क नसल्याने सरकार पोस्टच्या माध्यमातून 100 टक्के हामी घेते. (Post Office)

आपण या योजनेमध्ये महिन्याला आपण 1000 रूपये गुंतवणूक करू शकता. तर सेव्हिंग स्किममध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक ही 30 लाख रूपयांपर्यंत करू शकता. निवृत्तीनंतर पोस्टाची ही योजना आर्थिकदृष्ट्या वृद्धांसाठी तसेच वरिष्ठांसाठी फायदेशीर ठरत आहे. वय वर्षे 60 ते त्याहून अधिक वरिष्ठांसोबत आपण जॉईंट अकाऊंट सुरू करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे गुंतवणूक करू शकता. पण या कालावधी आधीच जर आपण खाते बंद केलं तर गुंतवणूकदारास पेनल्टी द्यावी लागते. तसेच या योजनेमध्ये काही सेवानिवृत्त कर्मचारी नागरिकांचं वय हे 55 ते 60 दरम्यान आहे त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत.

किती मिळेल परतावा?

जर आपण 30 लाख रूपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला 8.2 टक्के व्याजदरानुसार मासिक उत्पन्न हे 20 हजार रूपये मिळेल. वार्षिक उत्पन्नाचं गणित पाहिलं तर 2.46 लाख रूपये व्याज मिळेल.

News Title – Post Office Senior Citizen Savings Scheme News Update

महत्त्वाच्या बातम्या

पाण्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘कोणी माईका लाल…’

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर

भन्नाट फीचर्ससह महिंद्रा कंपनीची कार लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये

कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच

…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now