सियाला घेऊन पोलीस पोहोचले लोहगडावर; पुढे नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली माहिती

On: June 28, 2026 2:39 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Ketan Agarwal Case | केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्य आरोपी सिया गोयलला (Siya Goyal) लोहगड (Lohagad) किल्ल्यावर नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (Sandeep Singh Gill) यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. या प्रक्रियेतून तपासासाठी महत्त्वाचे पुरावे आणि धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी आरोपींकडून उलगडला संपूर्ण घटनाक्रम :

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन घटना नेमकी कशी घडली, कोणत्या मार्गाने ते तेथे पोहोचले आणि केतनला कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे, याची प्रत्यक्ष पुनर्रचना करून घेतली. या सीन रिक्रिएशनदरम्यान प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचाही बारकाईने आढावा घेण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी विविध मुद्द्यांवर आरोपींकडून माहिती घेत तपासाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला.

याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, सीन रिक्रिएट करण्यात आला असून आरोपींनी संपूर्ण घटनाक्रम, त्यांनी वापरलेला मार्ग आणि घटना कशा प्रकारे घडवून आणली याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात पंचनामा करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रत्यक्ष पाहणीतून तपास अधिक भक्कम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ketan Agarwal Case | इंटरनेटवर शोधली होती हत्येची माहिती :

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनची हत्या करण्यापूर्वी इंटरनेटचा वापर करून विविध पर्यायांचा शोध घेतला होता. केतनचा खून कशा प्रकारे करता येईल, विष देण्याचा पर्याय, अपघाताचा बनाव कसा उभा करता येईल आणि लोहगड किल्ल्यावरून कोणत्या ठिकाणावरून खाली ढकलल्यास तो अपघात वाटेल, यासंबंधी त्यांनी गुगलवर माहिती शोधल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्याचे मार्गदेखील इंटरनेटवर शोधले होते. 31 मे रोजी सिया आणि केतन लोहगडावर फिरण्यासाठी गेले असताना केतनला दरीत ढकलून अपघाताचा आभास निर्माण करण्याची कल्पना सियाच्या मनात आल्याचा संशय आहे. त्यानंतर किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणांची लोकेशन्स तिने चेतन चौधरीला व्हॉट्सॲपद्वारे पाठवल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

News Title: Police Recreate ketan agrwal Lohagad Murder Scene

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now