पीएमआरडीएच्या ‘रिंग रोड’ला गती; ‘या’ 13 गावांतील जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव

On: February 7, 2025 10:22 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) ‘रिंग रोड’ (Ring Road) भूसंपादनाअभावी रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘पीएमआरडीए’ने ‘रिंग रोड’साठी 13 गावांतील सुमारे 115 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) पाठविला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळापाठोपाठ (MSRDC) ‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भूसंपादनाअभावी रखडला प्रकल्प:

वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) रिंग रोड उभारण्याची तयारी करत आहे. मात्र, या ‘रिंग रोड’साठी भूसंपादनाला (Land Acquisition) अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

Pune News l ‘पीएमआरडीए’चा रिंग रोड:

‘पीएमआरडीए’चा रिंग रोड 83 किलोमीटर लांबीचा आणि 65 मीटर रुंदीचा आहे. यासाठी सुमारे 700 ते 750 एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.

कोणत्या गावांत भूसंपादन:

वडाची वाडी
भिलारेवाडी
पिसोळी
येवलेवाडी
गुजर निंबाळकरवाडी
मांगडेवाडी
जांभूळवाडी
आंबेगाव खुर्द
कदमवाकवस्ती
सोळू
निरगुडी
वडगाव शिंदे
म्हाळुंगे

प्रस्ताव आणि पुढील कार्यवाही:

रस्ते विकास महामंडळ करत असलेला रिंग रोड सोळू गावापर्यंत येत आहे. त्या ठिकाणी ‘पीएमआरडीए’चा रिंग रोड येऊन मिळणार आहे.
त्यामुळे आळंदी ते नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या ‘रिंग रोड’ची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्राधिकरणाने हाती घेतली आहे.

जिल्ह्यातील 13 गावांमधील 115 हेक्टर जागेचे प्रस्ताव मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाला (Land Records Department) जिल्हा प्रशासनाने पाठविले आहेत. त्यानुसार, एका महिन्यात संयुक्त मोजणी (Joint Measurement) करण्यात येणार आहे.

News Title : PMRDA Submits Proposal for Land Acquisition for Ring Road

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now