महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीएलचा मोठा निर्णय; भाविकांना मोठा दिलासा

On: February 25, 2025 11:31 AM
Pune News
---Advertisement---

PMPML l महाशिवरात्रीनिमित्त नीळकंठेश्वर, बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) जादा बसची सोय करण्यात आली आहे. कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट मुख्य स्थानक आणि निगडी (पवळे चौक) या स्थानकांवरून बुधवारी (दि. 26) जादा बसेस धावणार आहेत.

जादा बसेसची व्यवस्था :

शहर आणि उपनगरातून हजारो भाविक दर्शनासाठी नीळकंठेश्वर, बनेश्वर, घोरावाडेश्वर मंदिरात जातात. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांच्या सोयीसाठी, पीएमपीने जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

PMPML l बस मार्ग आणि वेळ :

कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा): पहिली फेरी पहाटे 5:30 वाजता. नियमित बसमार्ग – कात्रज ते सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज ते वेल्हे.

निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी): पहिली फेरी पहाटे 5:20 वाजता. नियमित बसमार्ग – कात्रज ते वडगाव मावळ, निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ, निगडी ते उर्सेगावमार्गे तळेगाव, निगडी ते उर्सेगावमार्गे परंदवाडी, निगडी ते लोणावळा. या मार्गांवर एकूण 24 बसेस धावतील. भाविकांच्या सोयीसाठी बस स्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

News Title: PMPML Extra Buses for Mahashivratri; Details Inside

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now