पुण्यात ५० प्रवाशांनी भरलेली धावती बस अचानक पेटली; पुढे घडलं भयंकर?

On: February 13, 2026 6:29 PM
PMPML Bus Fire
---Advertisement---

PMPML Bus Fire | पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. PMPML ची प्रवासी बस अचानक पेटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे ५० प्रवासी बसमध्ये असताना ही घटना घडली, मात्र चालक आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्वांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली.

चाकणमध्ये धावत्या बसला आग :

ही घटना पुण्याच्या (Pune) चाकण औद्योगिक वसाहतीत महिंद्रा कंपनी (Mahindra) समोर घडली. औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आलेली ही बस नियमित फेरीवर होती. अचानक बसमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच परिस्थिती गंभीर बनली आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. (PMPML Bus Fire News)

प्राथमिक माहितीनुसार ही PMPMLची इलेक्ट्रिक बस होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बसमध्ये अंदाजे ५० प्रवासी प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

PMPML Bus Fire | अग्निशमन दलाची धावपळ :

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले; मात्र तोपर्यंत ज्वाळांनी बस पूर्णपणे वेढली होती. अखेर बस आगीत पूर्ण जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

या प्रकारानंतर इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. औद्योगिक भागात कामगारांसाठी धावणाऱ्या बसमध्ये अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने प्रवाशांना काहीही इजा झाली नसली तरी या आगीमुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.

News title : PMPML Bus Catches Fire in Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now