PM Modi Appeal During Heatwave | देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. कडक उन्हाच्या या काळात स्वतःची काळजी घेण्यासोबतच वृद्ध आणि मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशील राहण्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले.
आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला
सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिण्यावर भर द्यावा, असे पंतप्रधानांनी म्हटले. घराबाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि दुपारच्या तीव्र उन्हात विनाकारण बाहेर जाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच समाजात एकमेकांना मदत करण्याची भावना जपण्याचे आवाहन करत त्यांनी तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. घराबाहेर किंवा दुकानांसमोर थंड पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to…
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
वृद्ध आणि मुक्या प्राण्यांची काळजी घ्या
पंतप्रधान मोदींनी विशेषतः वृद्ध नागरिकांची काळजी घेण्यावर भर दिला. आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींना वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून द्यावी तसेच त्यांना उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला द्यावा, असे त्यांनी सांगितले.
मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही या उष्णतेचा मोठा फटका बसत असल्याचे नमूद करत त्यांनी नागरिकांना घराबाहेर, बाल्कनी, गच्ची किंवा दुकानांसमोर पाण्याची भांडी ठेवण्याचे आवाहन केले. तीव्र उष्णतेच्या या दिवसांत माणसांसोबतच प्राण्यांप्रतीही करुणा आणि संवेदनशीलता दाखवण्याचा संदेश त्यांनी दिला.
News Title: PM Modi Appeal During Heatwave Alert






