पंजाबचा दणदणीत विजय, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

On: May 5, 2025 10:13 AM
LSG vs PBKS 2025
---Advertisement---

PBKS l आयपीएल 2025 च्या 54 व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 236 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात लखनौला केवळ 199 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयामुळे पंजाबने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेत मुंबई इंडियन्सला झटका दिला आहे.

पंजाबच्या विजयानंतर त्यांच्या खात्यात आता 11 सामन्यांतून 15 गुण जमा झाले आहेत. एक सामना रद्द झाल्याने पंजाबला केवळ तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सध्या पंजाबचा नेट रनरेट +0.376 असून प्लेऑफच्या शर्यतीत त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

प्रभसिमरनची जबरदस्त खेळी :

पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने आक्रमक फलंदाजी करत 45 चेंडूत 91 धावा ठोकल्या. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने 45, शशांक सिंहने नाबाद 33 आणि जोश इंग्लिसने 30 धावांचे साथ दिले. पंजाबने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 236 धावा केल्या. लखनौकडून आकाश महाराज सिंह व दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

लखनौकडून प्रत्युत्तरात आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी झुंज दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. बदोनीने 40 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या, तर समदने 24 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने लखनौला पराभव पत्करावा लागला.

पंजाबचा प्लेऑफमध्ये दावा मजबूत :

पंजाबकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अझमतुल्लाह ओमरझईला 2, आणि मार्को यान्सेन व युझवेंद्र चहलला प्रत्येकी 1 यश मिळाले. पंजाबचा हा या मोसमातील सातवा विजय असून लखनौवर त्यांनी दुसऱ्यांदा मात केली आहे. याआधी 1 एप्रिल रोजी पंजाबने लखनौचा 8 विकेट्सने पराभव केला होता.

प्लेऑफच्या शर्यतीत आता पंजाबची स्थिती अधिक बळकट झाली आहे. मुंबईला मागे टाकत त्यांनी दुसरे स्थान मिळवले असून उर्वरित सामने जिंकून ते अव्वल स्थान मिळवण्याच्या तयारीत आहेत.

News Title : PBKS vs LSG: Punjab Kings Beat Lucknow Super Giants by 37 Runs, Climb to 2nd Spot in IPL 2025 Points Table

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now