Pawar Family Loss Election | आतापर्यंत राज्यात पवार कुटुंबाचा तीन वेळा पराभव झाला असल्याचं समजतंय. शरद पवार हे 1967 पासून संसदेचे सदस्य आहेत. पुणे येथे काँग्रेस पक्षातून शरद पवार काम करत होते. तेव्हा शरद पवार यांचे थोरले बंधू वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षात काम करत होते. त्यावेळी त्यांच्या मातोश्री शारदा पवार देखील शेतकरी कामगार पक्षातून काम करत होत्या. शरद पवार हे काँग्रेसमध्ये असल्याने त्यांनी तत्कालीन पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव जेधे यांचा प्रचार केला. त्यावेळी शरद पवार यांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांचा पराभव झाला. पवार कुटुंबातील सदस्याचा हा पहिला पराभव होता. (Pawar Family Loss Election)
वसंतराव पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचा पराभव
तर दुसरीकडे मागील लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना पवार कुटुंबाला दुसरा पराभव स्विकारावा लागला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उभं करण्यात आलं होतं. मात्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. हा पराभव हा पवार कुटुंबाताचा आतापर्यंतचा दुसरा पराभव असल्याची माहिती समोर आली. (Pawar Family Loss Election)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटीनंतर अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांचा प्रचार केला होता. मात्र त्यानंतर पार्थ पवारांचा पराभव झाला. हा पराभव श्रीरंग बारणे यांनी केला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुलाचा ज्यांनी पराभव (Pawar Family Loss Election) केला अशा श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता.
त्यानंतर तिसरा पराभव हा पवार कुटुंबातच झाला. लोकसभा निवडणूक 2024 आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. पक्ष फूटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभा निवडणुकीची प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या. यामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात पवार कुटुंबाचा तीन वेळा पराभव झाला आहे. (Pawar Family Loss Election)
पवारांचीच हार आणि पवारांचीच जीत
सुरूवातीला वसंतराव पवार याचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत झाली. यामध्ये एका पवार कुटुंबातील सदस्याने त्याच कुटुंबातील सदस्याला लोकसभा निवडणुकीत चित केलं. अर्थातच सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांनी चित केलं आहे.
News Title – Pawar Family Loss Election Till 2024
महत्त्वाच्या बातम्या
कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं
अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?
…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा
इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट






