पठाण बाॅक्स ऑफीसवर घसरला, आकडा वाचून व्हाल आश्चर्यचकित

On: February 3, 2023 11:48 AM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) पठाण(Pathaan) हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

पहिल्या आठवड्यात हा चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळं या चित्रपटाची अल्पवाधीतच रेकाॅर्डब्रेक कमाई झाली होती. या चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत.

परंतु सध्या या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आठव्या दिवशी या चित्रपटानं केवळ १८.२५ कोटी रूपयांचा गल्ला कमवला. तर नवव्या दिवशी त्याहून कमी म्हणजे फक्त १५.५० कोटी रूपयांचा गल्ला कमवला आहे.

चित्रपटाची अलीकडची कमाई पाहता यात मोठी घसरण झाल्याचे साफ दिसत आहे. परंतु आता शनिवारी-रविवारची सुट्टी लक्षात घेता पुन्हा हा चित्रपट जास्त कमाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पठाण चित्रपटाच्या निमित्तानं शाहरूख-दीपिकाची जोडी पुन्हा एकदा मनोरंजन करत आहे. यापूर्वी या जोडीनं ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now