‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा

On: November 27, 2024 6:42 PM
Amol Mitkari
---Advertisement---

Amol Mitkari | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. विधानसभा निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर राज्यभरातील नेते पदाधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांचं अभिनंदन करण्यासाठी देवगिरी निवासस्थानी येत होते. यावेळी अजित पवारांच्या निवडणुकीसाठी कँपेनिंग करणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी देखील अजित पवारांचं अभिनंदन केलं. मात्र यावेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नरेश अरोरा यांच्यावर टीका होऊ लागली.

नेमकं प्रकरण काय?

नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खांद्यावर हात टाकून फोटो पोस्ट केल्यानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच भडकले. यानंतर त्यांनी ट्विट करत नरेश अरोर यांच्यावर टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश हे केवळ अजित पवारांचं यश आहे, असं मिटकरी म्हणाले होते. तसेच नरेश अरोरांची हिंमत कशी झाली अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवायची, असा सवाल देखील त्यांनी केला होता. आता यावरून राष्ट्रवादीतील वातावरण तापलं आहे. तसेच पक्षातल्या पक्षात मतमतांतर दिसून येत असल्याचं दिसतंय.

अरोरा आणि अमोल मिटकरींचा वाद वाढताना दिसत आहे. कारण आता मिटकरी-अरोरा वादात थेट अजित पवारांचे (Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी उडी घेतली आहे. अमोल मिटकरींना (Amol Mitkari) पार्थ पवारांची चांगलंच झापलं आहे.

पार्थ पवार काय म्हणाले?

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. नरेश अरोरा आणि DesignBoxed संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडिल अजिबात समर्थन करत नाहीत, असं पार्थ पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

अमो मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, अशी भूमिका पार्थ यांनी ट्विट करुन मांडली आहे. तसेच अमोल मिटकरींनी मीडियाला बाईट देऊ नयेत, असा इशारा देखील पार्थ यांनी मिटकरींना दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का?

“लोकप्रियता मिळवण्यासाठी मी…”; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

‘मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना मान्य, जाता जाता म्हणाले…

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला मिळणार डच्चू?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now