‘ती आपल्यात नसली तर…’, शेफालीच्या निधनानंतर पराग त्यागीच्या ‘त्या’ पोस्टने नेटकरी संतापले

On: July 11, 2025 3:51 PM
Shefali Jariwala
---Advertisement---

Parag Tyagi | दिवंगत अभिनेत्री शेफाली जरीवालाचा (Shefali Jariwala) पती, अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi) याला पत्नीच्या निधनानंतर सोशल मीडियावर सक्रिय झाल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शेफालीच्या आठवणीत फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने, तो प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला होता. या टीकेवर आता परागने एक भावनिक उत्तर दिले आहे.

परागचा दुःखातून सावरण्याचा प्रयत्न-

शेफालीच्या निधनाला १५ दिवस उलटून गेल्यानंतर, पराग या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून तो तिच्यासोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र, त्याच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली. पत्नीच्या निधनानंतर लगेचच इतक्या पोस्ट करणे योग्य नसल्याचे काहींनी म्हटले, तर काहींनी याला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न म्हटले.

या ट्रोलिंगला उत्तर देताना परागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, “शेफालीला (परी) सोशल मीडियावर राहायला खूप आवडायचं आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम ती एन्जॉय करायची. मी स्वतः कधीच सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हतो.” त्याच्या मते, आता शेफाली त्याच्या हृदयात आहे आणि तिला सर्वांचे प्रेम मिळत राहावे, हाच त्याचा प्रयत्न आहे.

सोशल मीडियावर ती नेहमी जिवंत राहील-

“ती जरी आज आपल्यात नसली, तरी सोशल मीडियावर नेहमी जिवंत राहील. हे अकाउंट फक्त तिला समर्पित आहे आणि तिच्या आठवणी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करून मला त्या जपायच्या आहेत. मला नकारात्मक लोकांच्या मतांची पर्वा नाही,” अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावले आहे. अलीकडेच त्याने शेफाली, स्वतःचा आणि त्यांचा पाळीव कुत्रा सिंबाच्या हातांचा एक व्हिडिओ शेअर करत ‘आम्ही नेहमीच एकत्र राहू’ असे कॅप्शन दिले होते, ज्यावर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

News Title – Parag Tyagi Responds to Trolls Over Posts for Shefali

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now