गोळी लागल्यानंतरही विनय नरवाल जिवंत होते??? ‘त्या’ व्यक्तीने सगळं सांगितलं!

On: April 25, 2025 2:49 PM
himanshi narwal
---Advertisement---

Pahalgam Terror Incident | जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बैसरन घाटीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या हिंसक घटनेत २६ पर्यटकांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हरियाणातील (Haryana) नेव्ही अधिकारी विनय नरवाल यांचा देखील समावेश आहे.

हनीमूनसाठी गेलेल्या नवविवाहित अधिकाऱ्याचा मृत्यू-

२६ वर्षीय विनय नरवाल हे भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अवघ्या सात दिवसांपूर्वी, १६ एप्रिल रोजी त्यांचे हिमांशीसोबत लग्न झाले होते. विवाहानंतर ते हनीमूनसाठी पहलगामला (Pahalgam) गेले होते. मात्र, त्यांच्या या आनंदाच्या क्षणांना दहशतवाद्यांनी काळं फासलं. दहशतवादी हल्ल्यात विनय यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नीने हा आघात डोळ्यांसमोर पाहिला.

या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इरशाद अहमद (Irshad Ahmad), जे एटीव्ही स्टँडवर कार्यरत आहेत, त्यांनी घटनास्थळावर घडलेले सांगितले. पोलिसांकडून आलेल्या फोनवर त्यांनी आपली वाहने बचावकार्यासाठी पाठवली. बैसरनमध्ये कोणतेही मोठे वाहन जाऊ शकत नसल्याने त्यांनी एटीव्ही वापरून मृतदेह बाहेर काढले. इरशाद यांनी सांगितले की त्यांनी पहिला मृतदेह स्वतः उचलला, आणि नेव्ही ऑफिसर विनय यांना स्वतःच घाटीबाहेर आणले.

पत्नीला दिले खोटे दिलासादायक शब्द-

इरशाद अहमद यांनी या काळजाला (Pahalgam Terror Incident) चिरणाऱ्या घटनेत आणखी एक भावनिक बाब सांगितली. विनय यांची नाडी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले, पण त्यांच्या पत्नीला धक्का बसू नये म्हणून त्यांनी तिला खोटं सांगितलं की विनय जिवंत आहेत. त्यांनी सांगितलं, “मी तिला समजावलं की चिंता करू नकोस, मी त्यांना रुग्णालयात घेऊन जातोय.” पण रुग्णवाहिकेत नेत असतानाच त्यांच्या मृत्यूचं सत्य उघड झालं. हे दृश्य पाहून इरशाद स्वतः अनेक वेळा भावनाविवश होऊन रडले.

विनयच्या पत्नीने अखेरचा निरोप देताना शवपेटीला मिठी मारली आणि अश्रूंच्या सागरात हेलावली. शेवटी ती सॅल्यूट करत “जयहिंद” असं म्हणाली. या दु:खद घटनेनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांनी विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचं सावट-

विनय नरवाल हे हरियाणाच्या कर्नल जिल्ह्यातील (Pahalgam Terror Incident) रहिवासी होते. ते दोन वर्षांपूर्वीच नौदलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे. विनयच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. लग्नानंतर विनयला स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनसाठी जायचे होते, मात्र व्हिसा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरची निवड केली आणि तीच त्यांची शेवटची यात्रा ठरली.

विनयच्या पत्नीचे मृतदेहाजवळ बसलेले फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका नवविवाहित जोडप्याचं स्वप्न सुरू होतानाच एका भीषण घटनेने संपुष्टात आलं, हे पाहून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.

News Title – Pahalgam Terror Incident Navy Officer

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now