‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?

On: October 15, 2024 2:29 PM
Grampanchayat Election 2025
---Advertisement---

Voter List l कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक घोषित होताच मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. कारण मतदारांनी दिलेल्या मतांवर उमेदवार निवडून येत असतात. तसेच निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी सुद्धा जाहीर होत असते. पण तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही हे माहित असं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही आता घरबसल्या देखील हे तपासू शकता.

अशाप्रकारे तुमचं नाव आहे का शोधा? :

– सर्वात पहिल्यांदा https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर विचारलेली आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा, यानंतर ‘Search’ या ऑप्शनवर क्लिक करा.
– यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, आणि EPIC Number यासह विचारलेली सर्व माहिती दिसेल.
– पुढे सर्च केल्यानंतर देखील तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहा. अन्यथा त्या तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तसेच तरी देखील नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.

Voter List l SMS द्वारे देखील मतदार यादीतील नाव तपासता येणार? :

जर तुम्हाला एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा मेसेज टाईप करावं लागेल. त्यासाठी मेसेज टाईप करताना पहिल्यांदा स्पेस दाबा. त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक मेसेजमध्ये टाईप करा आणि हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर या नंबरवर पाठवा.

जर तुम्ही ही सोपी प्रक्रिया केली तर तुम्हाला एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल. याशिवाय तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज देखील तुम्हाला येईल.

News Title : Online Voter List Check

महत्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

बोपदेव घाटातील प्रकरण ताजं असतानाच पुण्यात घडली आणखी एक धक्कादायक घटना!

आचारसंहिता म्हणजे काय? ‘या’ दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते?

थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now