‘तुमच्याकडे राऊत असतील…’; जाता जाता राज्यपालांचा संजय राऊतांना टोला

On: February 13, 2023 1:13 PM
---Advertisement---

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा (Bhagat Sinh Koshyari) राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु (Draupadi Murmu) यांनी स्विकारला आहे.

राजीनामा दिल्यानंतर कोश्यारी पहिल्यांदाच मुंबईतील एका कार्यक्रमात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत, शहरात असेल गुंडागर्जी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील, पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत, असं कोश्यारी म्हणालेत.

तुमच्याकडे देशपांडे आहेत, तर आमच्याकडे पांडे आहेत, तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे, असं म्हणत भगतसिंग कोश्यारी यांनी जाता जाता संजय राऊत यांना टोला लगावला.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्याजागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now