ATM वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: March 27, 2025 2:49 PM
ATM Charges Increase
---Advertisement---

NPCI Rule Change | ATM वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 1 मे 2025 पासून बँकेच्या नेटवर्कबाहेरील ATM वापरल्यास अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशींनुसार ATM इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. (NPCI Rule Change)

ATM व्यवहारावर किती शुल्क वाढणार?

सध्या बँक ग्राहकांना त्यांच्या ‘होम बँके’च्या ATM वगळता इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी दर व्यवहारामागे ₹17 शुल्क आकारले जाते. मात्र 1 मे 2025 पासून हे शुल्क ₹19 होणार आहे.

तसेच दुसऱ्या बँकेच्या ATM वर बॅलन्स चेक केल्यास सध्या ₹6 शुल्क घेतले जाते, ते आता ₹7 करण्यात येणार आहे. ही दरवाढ फक्त विनामूल्य मासिक व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर लागू होणार आहे.

मोफत व्यवहारांची मर्यादा काय आहे?

मेट्रो शहरांमध्ये: एका महिन्यात इतर बँकेच्या ATM वर 5 मोफत व्यवहार

बिगर मेट्रो शहरांमध्ये: एका महिन्यात इतर बँकेच्या ATM वर 3 मोफत व्यवहार

यापुढील व्यवहारांवर वरीलप्रमाणे वाढीव शुल्क लागू होईल.

शुल्कवाढीमागचं कारण काय?

व्हाईट लेव्हल ATM चालकांकडून सतत मागणी केली जात होती की ऑपरेशनचा खर्च वाढल्यामुळे सध्याचे शुल्क अपुरे ठरत आहे. NPCI ने या प्रस्तावावर आधारित सुधारणा रिझर्व्ह बँकेकडे पाठवली होती, ज्याला आता मंजुरी देण्यात आली आहे.

हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, इंटरचेंज फी म्हणजे ती रक्कम जी ग्राहकाच्या बँकेने त्या बँकेला द्यावी लागते ज्याच्या ATM वर ग्राहकाने व्यवहार केला असतो. त्यामुळे छोट्या बँकांवर याचा अधिक आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे.

 Title : NPCI Rule Change ATM Withdrawal to Cost More from May 1

 

Join WhatsApp Group

Join Now