‘आता लढण्याची ताकत उरली नाही…’; चौथ्या चिठ्ठीत शिरीष महाराजांनी सगळंच सांगितलं

On: February 5, 2025 5:40 PM
Note written by Shirish Maharaj More before committing suicide
---Advertisement---

Shirish Maharaj More | ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांच्या आत्महत्येने अवघ्या देहू नगरीसह वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांपैकी चौथ्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मनातील उद्वेग आणि हतबलता व्यक्त केली आहे.

त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या.

पहिली चिठ्ठी : आई, वडील आणि बहिणीला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे.

दुसरी चिठ्ठी: होणाऱ्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी अनेक स्वप्न दाखवल्याबद्दल माफी मागितली असून, “माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग” असे भावनिक आवाहन केले आहे.

तिसरी चिठ्ठी : कुटुंबाला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावरील कर्जाचा उल्लेख केला आहे.

चौथी चिठ्ठी : मित्रांना उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली आहे.

कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचे कारण:

या चिठ्ठ्यांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराजांवर कर्जाचा मोठा डोंगर होता. “माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या,” अशी विनंती त्यांनी चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना केली आहे. “मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे,” असेही त्यांनी या चिठ्ठीत म्हटले आहे. (Shirish Maharaj More)

कोण होते शिरीष महाराज मोरे?

ह.भ.प. शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार होते. शिवव्याख्याते म्हणूनही पंचक्रोशीत त्यांचा मोठा लौकिक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांचे निगडी येथे एक इडलीचे उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. (Shirish Maharaj More)

Title : Note written by Shirish Maharaj More before committing suicide

 

 

Join WhatsApp Group

Join Now