नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

Narendra Modi | नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करत आहे. त्यापूर्वी दिल्लीत शुक्रवारी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली.

मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले. त्यांनी संविधानाची प्रत स्वतःच्या डोक्याला लावली. या कृतीमुळे उपस्थित सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या या कृतीचं स्वागत केलं. तर दुसरीकडे नितीश कुमारांनी देखील मोदींचे पाय धरल्याचं पाहायला मिळालं.

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) पाय धरल्याचं पाहायला मिळालं. नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार केला.

बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पण नितीश कुमार यांनी अशीच कृती केली होती. त्यांनी चर्चा सुरु असताना मोदींचे पाय धरले होते. आज पुन्हा ते मोदींच्या पाया पडले. या घटनेची देशभर चर्चा होत आहे.

Narendra Modi | एनडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड

एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले. एनडीएचा नेता म्हणून तुम्ही सर्वांनी सर्व संमतीने मला निवडले हे माझं सौभाग्य आहे, असे त्यांनी म्हटले. आपल्या दोघांमध्ये विश्वासाचा पूल मजबूत आहे. हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी दिवस पाहिला नाही. रात्र पाहिली नाही. प्रचंड उन्हात प्रत्येक दलाच्या कार्यकर्त्याने जे परिश्रम केले आहे, त्यांना मी मान झुकवून नमन करतो, असंही मोदी यावेळी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’

शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”