अभिषेकसोबत अफेरच्या चर्चांवर निम्रत कौर अखेर बोलली, व्हिडीओ तूफान व्हायरल

On: November 13, 2024 8:11 PM
---Advertisement---

Nimrat Kaur | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या सगळ्या गोष्टी घडत असताना काही दिवसांपासून अभिषेक अभिनेत्री निम्रत कौरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबद्दल बोललं जात आहे. नेटकरी अभिषेक आणि निम्रत (Nimrat Kaur) कौरला ट्रोल करत आहेत. दरम्यान यावर निम्रत कौरने खुलासा केला आहे. आपल्या अधिकृत अकाउंटवर निम्रतने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणाली निम्रत?

सोशल मीडियावर निम्रत कौरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. निम्रतने (Nimrat Kaur) नेटकऱ्यांसाठी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निम्रत म्हणाली की, मैत्री एवढी पक्की असली पाहिजे की, लोक जळले पाहिजे. निम्रतचा हा व्हिडीओ पंजाबी भाषेतला आहे. ती यामध्ये मैत्रीवर बोलत आहे. बोलत असताना ती म्हणते मैत्री बघून लोक जळून राख झाले पाहिजेत.

व्हायरल व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nimrat Kaur (@nimratofficial)

व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची मांजरही दिसत आहे. आता तिचा हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.  हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लोक जळतात असे म्हटलंय. निम्रत आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. एवढंच नाही तर, चर्चा रंगल्यानंतर निम्रतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.

News Title : nimrit kaur shares video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर समंथाचा मोठा खुलासा, म्हणाली…

‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

“निलंगा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे”

शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश

अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now