हनीमूनच्या रात्री नवरी शॉक, नवऱ्याने केलं असं काही की नवरीने थेट माहेर गाठलं

On: February 25, 2025 1:14 PM
Newlywed Woman Files Case After Honeymoon Assault
---Advertisement---

Honeymoon assault | लग्न हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. नवीन घर, नवीन कुटुंब, आणि आयुष्यभराची स्वप्ने घेऊन नववधू सासरी जाते. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत अनेक नवविवाहित स्त्रिया हनीमूनला जातात. मात्र, उत्तर प्रदेशातील एका तरुणीसाठी हा प्रवास दु:खद ठरला. हनीमूनच्या पहिल्याच रात्री तिच्यासोबत असा प्रकार घडला की तिला थेट आपल्या माहेरी परतावे लागले. (Honeymoon assault)

हनीमूनच्या दिवशीच संसार उध्वस्त

१२ फेब्रुवारी रोजी महाराजगंज (Maharajganj, Uttar Pradesh) येथे पीडितेचा विवाह डॉक्टर रत्नेश गुप्ता (Ratnesh Gupta) याच्यासोबत पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडला. तिच्या कुटुंबीयांना वाटले की, मुलीला प्रतिष्ठित आणि सुशिक्षित नवरा मिळाला आहे, त्यामुळे ती आनंदाने संसार करेल.

सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर १९ फेब्रुवारीला पती-पत्नी गोवा (Goa) येथे हनीमूनसाठी रवाना झाले. तरुणीच्या मनात सुंदर आठवणींसाठी उत्सुकता होती. ती समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याची, सुंदर सूर्यास्त पाहण्याची स्वप्ने रंगवत होती. पण हॉटेलमध्ये पोहोचताच नवऱ्याचा खरा चेहरा समोर आला.

हॉटेलच्या खोलीत नवऱ्याची अमानवी वागणूक

रात्री हॉटेलच्या खोलीत असताना अचानक रत्नेश अत्यंत रागाने तिच्यावर ओरडू लागला. काही समजण्याच्या आतच त्याने तिला मारहाण केली. घाबरून ती किंचाळू लागली, मात्र नवऱ्याच्या वागणुकीमुळे ती अत्यंत मानसिक तणावात गेली. तिने लगेचच आपल्या कुटुंबीयांना संपर्क साधला. तिच्या कुटुंबाने घाईघाईने फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि ती लगेचच गोव्याहून आपल्या घरी परतली.

पीडितेने घरी पोहोचताच आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, फक्त हनीमूनच नाही, तर लग्नाच्या पहिल्या काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी तिला हुंड्यासाठी त्रास दिला होता. सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मारहाण केली आणि मानसिक छळ केला. तिला आत्मसन्मान गमावण्याची वेळ आली होती. शेवटी तिने हा अन्याय सहन न करता सदर कोतवाली पोलीस ठाण्यात नवऱ्यासह सासरच्या सात जणांविरोधात हुंडाबळी आणि मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना (Somendra Meena) यांनी माहिती देताना सांगितले की, “महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.” (Honeymoon assault)

Title : Newlywed Woman Files Case After Honeymoon Assault

 

Join WhatsApp Group

Join Now