New Rules | प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या गोष्टींबाबत काही नियम बदल होत असतात. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या तारखेपासूनच अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहेत. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार, ते पाहुयात. (New Rules)
रेल्वे तिकीटसंदर्भात नवा नियम?
उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून अॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या नियमात काही बदल होण्याची शक्यता आहे. अॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी आता 120 ऐवजी 60 दिवस होऊ शकतो. येत्या 1 नोव्हेंबरपासून कोणत्याही प्रवासासाठी 60 दिवसाच्या अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. (New Rules)
मनी ट्रान्सफर नवा नियम-
रिझर्व्ह बँकेने (RBI) डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. उद्या 1 नोव्हेंबर 2024 रोजीपासून हा नवा नियम लागू होईल. फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. (New Rules)
LPG सिलिंडरचे दर वाढणार की घसरणार?
प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात बदल करत असतात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलंडरचा नवा दर लागू होण्याची शक्यता आहे. आता याचे दर वाढणार की घसरणार, त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष राहील. (New Rules)
SBI कार्डसाठी नवा नियम-
1 नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवे नियम लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिल असेल, तर तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. यासोबतच म्युच्यूअल फंडाच्या इनसाईडर ट्रेडिंगच्या नियमांत देखील बदल केला जाणार आहे. (New Rules)
News title – New Rules from November 1
महत्त्वाच्या बातम्या-
“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र
आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?; वाचा राशीभविष्य
2024 मध्ये ‘या’ पक्षाचा असणार मुख्यमंत्री; राज ठाकरेंचं भाकीत
अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार






