New Rules | वर्षातील सर्वात छोटा महिना अशी ओळख असलेल्या फेब्रुवारी महिन्याचा शेवट आता जवळ आला आहे तर, दोनच दिवसांत आर्थिक वर्षातील शेवटचा माहिना म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात होईल. 1 मार्च 2025 पासून नवीन नियम लागू होतील. काही आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. (New Rules)
‘या’ नियमात होणार बदल
मुदत ठेव (Fixed Deposit) नियमांमध्ये बदल: मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरांमध्ये काही बदल केले आहेत. बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. विशेषतः, 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी करणाऱ्या लहान गुंतवणूकदारांवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो.
एलपीजी, सीएनजी-पीएनजी, आणि एटीएफ दरांमध्ये संभाव्य बदल: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी, सीएनजी-पीएनजी, आणि विमान इंधन (एटीएफ) च्या किंमतींचा आढावा घेतात. 1 मार्च 2025 रोजी या इंधनांच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरगुती बजेटवर आणि प्रवास खर्चावर होऊ शकतो.
म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नामांकन प्रक्रियेत सुधारणा: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. (New Rules)
1 मार्च 2025 पासून हे नवीन नियम लागू होतील. या बदलांमुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे, या नियमांबद्दल अधिक माहिती घेऊन, आवश्यक ते बदल करण्याची शिफारस केली जाते.






